मुंबई : राज्यात तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना राजकीय धक्का देत शिवेसना-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आता पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरु झाला असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
तर अशात मिळालेल्या माहितीनुसार,’ राष्ट्रवादीत पक्षात दोन गट पडल्यानतंर अजित पवार यांना जास्त आमदारांच समर्थन मिळाल्याचे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे.