पिंपरी (प्रतिनिधी) – कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. ५) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास साई साठे पार्क, चिंचवड येथे करण्यात आली.
अमर सुनील वाघमारे (वय २३, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उमेश मोहिते यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे साई साठे पार्क हाऊसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेत एकजण कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अमर वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीचा एक कोयता जप्त केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.