पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आपल्या देशाच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या अनेक महिन्यांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या “वंदे माँ भारती’ या लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल अजय सिंह यांच्या हस्ते रविवारी झाले. सदर्न कमांडच्या मिल्खा सिंह स्टेडीयममध्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग हे या गीताचे मूळ गायक आहेत. ब्रिगेडियर बिक्रमजीत सिंग, सुभाष सहगल आणि करण मस्ताना यांच्या या पदरचनेला मंत्रमुग्ध करणारे संगीत संयोजन रणजीत बारोट यांचे आहे. तर या गीताचे व्हिडिओ संपादन अतुल चौहान, अवध नारायण सिंह, ब्रिगेडियर बिक्रमजीत, सुभाष सहगल आणि लेफ्टनंट कर्नल संदीप लेघा यांनी केले आहे.
ज्या सर्व स्तरावर आणि कुटुंबांमध्ये वैश्विक भावना जागृत करतात. या गीताचे अनावरण हा केवळ दक्षिण कमांडच्या गौरवशाली भूतकाळाचा सोहोळा नव्हता, तर कमांडचा वारसा पुढच्या पिढी साठी ठेवताना कमांडच्या उत्कटतेची, एकतेची आणि चिरकालीन दृष्टिकोनाची ही प्रचिती आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.