मुंबई – अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांबाबतचे एक ट्विट केले होते. यानंतर लवकरच अजित पवार भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहे. अजित पवार यांच्या नजीकचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर नॉट रिचेबल म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
मात्र आता खुद्द धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’सगळं काही ठीक आहे. परफेक्टली वेल’ सूचक विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे मुंबईला आले आणि त्यानंतर आज सकाळीच ते विधानभवनात दाखल झाले. यादरम्यान, अजित पवार हे विधानभवनात आले होते. त्यांच्याशी धनंजय मुंडे यांनी १५ मिनिटे चर्चा केली. अजित पवार यांचे विश्वासू आणि जवळचे धनंजय मुंडे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चर्चा अशाही रंगू लागल्या होत्या कि ते भाजप रावेसे करणार आहे. मात्र या सर्व चर्चांवर आता पूर्ण विराम लागला आहे. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यसह धनंजय मुंडेही भाजप पक्षात प्रवेश करणार की नाही अशा चर्चा रंगल्या आहे. धनंजय मुंडे तडका फडकी मुंबईला का रवाना झाले असा सवालही चर्चेत आला आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या राजकीय घडामोडीचे गूढ आणखी वाढले आहे. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.