वुहान – मधुमेहाच्या रूग्णांना दिले जाणारे मेटफॉरमिन हे स्वस्त औषध रूग्णांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे नव्या पाहणीत समोर आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही रूग्णांचा अभ्यास केल्यानंतर चीनच्या डॉक्टरांनी हा दावा केला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या मिन्नेसोटा युनिव्हर्सिटीनेही सहा हजार जणांची तपासणी केल्यावर असा निष्कर्ष काढला आहे, मेटफॉरमिन या औषधामुळे रूग्णाच्या मृत्यूचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
एका प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार ब्रिटनची आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सर्वप्रथम या औषधाचा उपयोग केला. मधुमेहासोबतच, हार्ट, स्तनांचा कर्करोग आदी आजारांतही या औषधाचा उपयोग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध अत्यंत स्वस्त असून भारतात मेटफॉरमिनच्या एका गोळीची किंमत दीड रूपया आहे. टाईप 2 मधुमेहावरील उपचारासाठी 1950 पासून या गोळीचा वापर केला जातो आहे.