IPL 2024 (LSG vs KKR Match, Toss Update) : आयपीएल 2024 चा 54 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर थोडयाच वेळात म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ भिडतील. या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी श्रेयस अय्यरच्या केकेआरने लखनऊचा ईडन गार्डन्सवर पराभव केला होता. अशा परिस्थितीत आज लखनौला घरच्या मैदानावर त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
दरम्यान, गुणतालिकेत केकेआरचा संघ 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौचा संघ 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौचे 10 सामन्यांतून 6 विजय आणि चार पराभवांसह 12 गुण आहेत आणि हा संघ केकेआरच्या फक्त एका स्थानाने खाली तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद (12 गुण) चौथ्या स्थानावर आहेत तर चेन्नई सुपर किंग्ज (10 गुण) आणि दिल्ली कॅपिटल्स (10 गुण) देखील पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत.चालू मोसमात दोन्ही संघांचे तीन सामने बाकी आहेत. दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल ( Toss Update) हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स कर्णधार के एल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. केएल राहुलने सांगितले की, या सामन्यात लखनौचा संघ एका बदलाने खेळताना दिसेल. मयंक यादवच्या जागी यश ठाकूर खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर कोलकाता प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल न करता खेळणार आहे.
🚨 Toss Update from Lucknow 🚨@LucknowIPL elect to bowl first against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/CgxfC5H2pD#TATAIPL | #LSGvKKR pic.twitter.com/CGjRtD0QSU
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
LSG vs KKR : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा. ( इम्पॅक्ट सब : अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड, वैभव अरोरा )
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर. ( इम्पॅक्ट सब : अर्शिन कुलकर्णी, मणिमारन सिद्धार्थ, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग, देवदत्त पडिक्कल)
लखनौ सुपरजायंट्स (एलएसजी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) हे संघ रविवारी आयपीएल प्लेऑफच्या दिशेने आमनेसामने येतील तेव्हा विजयासह अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याचा त्यांचा इरादा असेल. मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर कमी धावसंख्येच्या सामन्यात 24 धावांनी पराभव केल्यानंतर, KKR चे 14 गुण आहेत आणि संघ प्लेऑफ पात्रतेच्या अगदी जवळ आहे.
अशा स्थितीत श्रेयस अय्यरच्या संघाच्या धोक्यापासून वाचण्याचा मार्ग शोधण्यासाठी लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली एलएसजीवर दबाव असेल. या मोसमात उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात केकेआरने लखनौचा पराभव केला होता आणि आता लखनौ आपल्या घरच्या मैदानावर कोलकात्याकडून बदला घेण्याचा प्रयत्न करेल.