काहींना कोबी खूप आवडते तर काही लोक कोबी पाहिला तर अनेक लोक नाक मुरडतात. परंतु कोबी ही आरोग्यास खूप फायदेशीर असते. आपण कोबीचा उपयोग भाजीसाठी करतो. सूप बनविण्यासाठीही कोबीचा उपयोग केला जातो. पांढरट-हिरवा व लाल-जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत.
कोबीमध्ये कॅल्शिअय, फॉस्फरस, लोह, “क’ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात आहेत, म्हणूनच कोबीचा आहारात आवर्जून समावेश करावा. कोबी निवडताना नेहमी पोकळ गड्डयापेक्षा कठीण घट्ट गड्डा निवडावा व भाजी करण्यापूर्वी तो दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
1. थाडरॉईड ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करण्यात महत्त्वाची भुमिका बजावतो.
2. पोट स्वच्छ ठेवण्यासाठी कोबी खूप प्रभावी आहे. त्यात क्लोरीन आणि सल्फर नावाची दोन अत्यंत महत्त्वाची खनिजे आहेत.
3. वजन कमी करायचे असल्यास कोबीचा रस प्याला पाहिजे. पचन सुधारते आणि कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते.
4. कोबीमध्ये फॉलिक ऍसिड असते. अल्सरच्या उपचारात हा एक योग्य उपाय मानला जातो.
5. ज्यांना अशक्तपणाची समस्या आहे त्यांनी आठवड्यातून चार वेळा कोबी सेवन करावा. कोबीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
6. कोबी खाल्ल्याने त्वचा चमकदार करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
7. कोबी नेहमी खाल्याने स्कीनवर रिंकल पडत नाही. कोबीमध्ये व्हिटॅमिन “सी’ आणि “ए’ असल्याने त्वचा निरोगी राहते.
8. कोबी गरम पाण्यात उकळून त्यात लिंबू रस टाकून डोक्याला लावल्याने केसांची वाढ चांगली होते.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886