सुशांत शिंगं राजपूत नि आत्महत्या केली. का?.. कशासाठी? माहीत नाही. पैशामुळे तर मुळीच नसेल. असे म्हणतात की तो सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. आजची परिस्थिती बघितली, तर आज प्रत्येक घरातील कर्ता पुरुष व महिला देखील डिप्रेशनमध्ये आहे. कारणे वेगवेगळी आहेत. पण एक कारण सगळ्यांच एकच असू शकत आणि ते म्हणजे कसं होणार? खरचं काळजी प्रत्येकाला आहे.
पण मनात कुडत बसण्यापेक्षा व्यक्त व्हा. आपल्या मित्रांजवळ, घरातील मेंबर्सबरोबर, नातेवाईकाबरोबर. कुठेतरी मन मोकळं करा. आणि डिप्रेशनला बाहेर पडण्याचा रस्ता मोकळा करा. नक्कीच मार्ग निघतील. कारण कुठल्याही समस्येवर काहींना काही उपाय नक्कीच आहे. काळ हा सर्वात मोठा उपाय आहे. चांगले दिवस येतील. नक्कीच येतील कारण वाईट गोष्टीनंतर चांगली गोष्ट नक्कीच येते.
फक्त त्या दिवसाची आपल्याला वाट बघायची आहे. तोपर्यंत आपल्या मनातील निगेटिव्हीटीला आपल्याला काबूत करायचे आहे. तेव्हा सर्व माझ्या मित्रांना, मैत्रिणीना एकच विनंती आहे. व्यक्त व्हा, शांत रहा, एकमेकांशी बोला. चांगले दिवस तुमची आपली वाट पहात आहेत.
किरण गायकवाड
रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदे.
संपर्क : 9730802803