पालेभाजी म्हटलं, की सगळ्यात आधी नाव येत ते म्हणजे पालक. पालक ही आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी मानली जाते. पालकाच्या भाजीत व्हिटॅमिन अ, ब, आणि ई, प्रोटीन, फॉलीक ऍसिड, सोडियम, फॉस्फरस, लोह असते. पालकाची भाजी नियमित खाल्याने शरीरातील रक्ताची आणि हिमोग्लोबीनची कमतरता दूर होते.
1. दररोज पालकाचा रस प्यायल्याने चेहरा चमकदार बनतो आणि त्वचा हायड्रेट राहते.
2. पालकांमध्ये व्हिटॅमिन क असते. ज्यामुळे हाडे मजबूत करण्यास मदत होते.
3. फायबर असलेल्या पदार्थामुळे पचनक्रिया चांगली होते. पालकांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे रोजच्या आहारात पालकाच्या भाजीचा समावेश करून तुम्ही आरोग्यही चांगला ठेवू शकता.
4. पालकमधले मिनरल्स शरीराचे फोटो लेवल कंट्रोल करण्यास मदत करते.
5. पालक दुधालादेखील पर्याय ठरू शकतो. ज्यांना दूध आवडत नाही, त्यांनी पालकापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ करून खावेत.
डॉ आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.