पुणे – पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यातील काही भाग आणि बारामती, इंदापूर, हवेली , शिरूर, वेल्हा, भोर, दौंड या सात तालुक्यातील 72 गावे कंन्टेंन्मेट झोन म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार या कंन्टेंन्मेट झोनमध्ये उद्योग आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
मात्र कंन्टेन्मेंट झोन वगळता उर्वरित क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासनाकडून सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील उद्योग, कारखाने, सर्व दुकाने, बांधकामांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.
सातच्या आत घरात:
पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कॅन्टोंमेंट परिषद तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री सात ते सायंकाळी सात या कालावधीत घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमधील गावे:
बारामती – माळेगाव बुद्रक व लकडेनगर.
इंदापूर – भिगवण, तक्रारवाडी व डिक्सळ.
हवेली – जांभुळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी व कोळेवाडी या गावाचा रहिवास परिसर, किरकटवाडी (कोल्हेवाडी), नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाची वाडी, हांडेवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवस्ती, लोणी काळभोर, कोंढवे धावडे.
शिरुर – शिक्रापूर.
वेल्हा – निगडे , ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक व कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा, ब्राम्हणघर, हिरपोडी.
भोर – नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, केळवडे, नायगाव, मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, विरवाडी, व केतकवळे.
दौंड – दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकर मळा, बैलखिळा, व डुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र, मौजे गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी, पवार वस्ती, दळवीमळा (सोनवडी), भवानीनगर व भोंगळेमळा
यांना आहे परवानगी:
परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींना परवानगी. चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालकाव्यतिरिक्त दोन तर दुचाकी वाहनांवर मागच्या सिटवर व्यक्तीला बसता येणार नाही.
ग्रामीण भागात उद्योगांना परवानगी मात्र सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक शहरी भागात ज्या बांधकाम साईटवर प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध असतील आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही अशा बांधकामांनाच परवानगी
ग्रामीण भागातील सर्व बांधकामांना परवानगी
ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने सुरु राहणार
ग्रामीण भागात खासगी कार्यालये फक्त 33 टक्केच मनुष्यबळाला परवानगी. मेट्रोची कामे, व इतर मान्सूनपूर्व कामे
इमारतीची दुरुस्ती, सुरक्षितरित्या इमारती पाडणे,
हे राहणार बंद:
सिनेमा गृह, मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, बार, सभागृह
सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे
सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद, धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई
कंटेन्मेंट झोनमध्ये सलून, स्पा राहणार बंद