मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘दिशा पटानी’ आपल्या ड्रेसिंग स्टाईल आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. दरम्यान, पुन्हा एकदा दिशा चर्चेत आली आहे.
सध्या लॉकडाऊन मुळे दिशा आपल्या घरात बसून आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टग्रामवर एक टिक-टॉक व्हिडीओ पोस्ट केला असून, यामध्ये तिला एक न्हवे तर चक्क चार बॉयफ्रेंड पाहिजे असल्याचं दिशाने सांगितलं आहे.
या व्हिडीओमध्ये दिशा म्हणतेय, “मला एक बॉयफ्रेंड हवा आहे. परंतु देवाने जर मला चार बॉयफ्रेंड दिले तर मी कोण होते नकार देणारी?” सध्या दिशाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.