काय सांगता! ‘अंडरटेकर’ने अक्षयला दिले फाईट करण्याचे चॅलेंज; थक्क झालेल्या अक्षयने दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

गेल्या रविवारी अक्षय कुमारने “खिलाडीयोंका खिलाडी’ ची 25 वर्षे साजरी केली होती. त्या सिनेमामध्ये द अंडरटेकरबरोबर केलेल्या फाईटमध्ये प्रत्यक्षात ब्रयन ली हा रेसलर होता, हा गौप्यस्फोटही त्याने केला होता. 

अक्षयने सोशल मिडीयावरच्या पोस्टमध्ये एक मीम देखील शेअर केले होते. अंडरटेकरला कोणी कोणी हरवले असा प्रश्‍न विचारून त्याने ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच आणि रोमन रिन्स यांच्याबरोबर स्वतःचाही फोटो पोस्ट केला होता. 

मात्र आत अंडरटेकरने या मीमची दखल घेऊन अक्षयला खऱ्यखुऱ्या फाईटसाठी आव्हान दिले आहे. “खऱ्या सामन्यासाठी तू कधी तयार आहेस?’ असा प्रश्‍न त्याने अक्षयला विचारला आहे.

आता सिनेमात एका डमी फायटरबरोबर फाईट खेळणे कसे सोप होते हे अक्षयला आता समजू शकेल. आतापर्यंत त्याने या आव्हानाची कल्पना केलेली नव्हती. पण प्रत्यक्षात त्याला या आव्हानाला सामोरे जयचे झाल्यास त्यालाही डमी खिलाडीची गरज भासू शकते. 

अद्याप तर तरी त्याने या आव्हानाला उत्तर दिलेले नाही. मात्र जर त्याने हे आव्हान स्वीकारल्यास हा सामना नक्कीच प्रेक्षणीय होईल यात शंका नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.