होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या पॅन इंडिया चित्रपटांना जबरदस्त यश मिळाले आणि आता चाहते याच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत, ज्याचे संकेत ‘भाग 2’ मध्ये देण्यात आले होते. पण कदाचित चाहत्यांना यश, प्रशांत नील आणि होम्बल फिल्म्सच्या ‘KGF 3’ या त्रिकूटासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल अशी माहिती स्वःत प्रशांत नील सांगण्यात आली आहे.
प्रशांत नीलने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की,’हा चित्रपट नक्कीच येणार आहे. कारण असे नसते तर ‘KGF Chapter 2’ मधील तिसऱ्या भागासाठी इशारा मिळाला नसता. त्याची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे आणि तो पुढे जाण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले.
दरम्यान, प्रोडक्शन हाऊस होम्बल फिल्म्स, यश आणि ते स्वतः आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यांना एकत्र काम करण्यासाठी त्यांचे सर्व प्रकल्प संरेखित करावे लागतील.रॉक स्टार यश सध्या ‘टॉक्सिक’ आणि ‘रामायण’मध्ये व्यस्त आहे.