नॉटिंगहॅम – ओश्ने थॉमस, जेसन होल्डर, आंद्रे रसेल आणि शेल्डन कॉट्रेअलने केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर ख्रिस गेल आणि निकोलस पुरन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावत वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 7 गडी आणि 218 चेंडू राखुन दणदणीत पराभव करत विश्वचषक स्पर्धेची थाटात सुरूवात केली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी कराताना पाकिस्तानचा डाव 21.4 षटकांत सर्वबाद 105 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या वेस्ट इंडिजने हे आव्हान केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात 13.4 षटकांत 108 धावा करत पुर्ण केले.
यावेळी 106 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचे सलामीवीर शाई होप आणि ख्रिस गेलने आश्वासक सुरूवात केली. दोघांनीही पहिल्या चेंडूपासुनच फटकेबाजी करायला सुरूवात केल्याने दोघेही 10 षटकांतच विंडीजचा संघ स्सामना जिंकेल अशी शक्यता निर्माण झाली असताना मोहम्मद आमिरने होपला बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. यावेळी होपने 11 धावा केल्या. तर, यानंतर आलेला डॅरेन ब्राव्हो एकही धाव न करता परतल्याने सामन्यात रोमांच निर्माण झाला होता. मात्र, यानंतर आलेल्या निकोलस पुरणला हाताशी धरुन गेलने संघाचा डाव सावरायला सुरूवात केली.
यानंतर ख्रिस गेलने 3 षटकार आणि 6 चौकार मारत अर्धशतक झळकावल्याने विंडीज विजयाच्या उंबारठ्यावर येऊन ठेपला. विंडीजच्या 77 धावा धावा झाल्या असताना आमिरने ख्रिस गेलला बाद करत विंडीजला तिसरा आणि मोठा धक्का दिला. मात्र, निकोलस पुरनने विंडीजची आणखी पडझड होवू न देता 13 .4 षटकांत पाकिस्तानचे 105 धावांचे आव्हान सहज पार केले. यावेळी पुरनने फटकेबाजीकरत 19 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 34 धावांची आक्रमक खेळी केली. यामुळे विंडीजने 15 षटकांच्या आतच धमाकेदार विजय आपल्या नावे केला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या पाकिस्तानने सुरूवातीच्या षतकापासुनच फटकेबाजी करायला सुरूवात केली. मात्र, कॉट्रेअलच्या षटकात विनाकारण मोठा फटका मारण्याच्या नादात इमाम उल हक 2 धावा करुन बाद झाला. यानंतर फकर झमान आणि बाबर आझमने सावध खेळी करण्यावर भर दिला. मात्र, आंद्रे रसेलने 22 धावा करुन तग धरू पाहण्यात फखर जमानला 22 धावांवर बाद करुन पाकिस्तानच्या दुसऱ्या सलामीवीरही माघारी धाडले. तर, लागलीच रसेलने हॅरिस सोहेललाही बाद करत आपला दुसरा बळी टिपला. त्यामुळे पाकिस्तानची 10 षटकांत 3 बाद 45 अशी अवस्था झाली.
त्यानंतर क्रिजवर आलेल्या बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमदने पाकचा डाव सवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओश्ने थॉमसने बाबर आझमला 22 धावांवर बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी हजेरी लावण्याची जनु स्पर्धाच भरवली होती. यावेळी सर्फराज अहमद (8), इमाद वासिम (1), शादाब खान (0) यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 18 षटकांत 8 बाद 81 अशी झाली होती. यावेळी मोहम्मद हाफिजने थोडाफार संघर्षकरत पाकला शंभरीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओश्ने थॉमसने त्याला 16 धावा करुन पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का दिला. यानंतर आलेल्या वहाब रियाझने 2 षटकार 1 चौकार मारत पाकिस्तानला शंभरी गाठुन दिली. मात्र, रियाझला बाद करत होल्डरने पाकिस्तानचा डाव 105 धावांमध्येच रोखण्यात यश मिळवले. यावेळी विंडीजकडून थॉमसने 4, होल्डरने 3, रसेलने 2 तर कॉट्रेअलने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान 21.4 षटकांत सर्वबाद 105 (फकर झमान 22, बाबर आझम 22, वहाब रियाझ 18, मोहम्मएद हाफिझ 16, ओशाने थॉमस 4-27, जेसन होल्डर 3-42, आंद्रे रसेल 2-4) पराभुत विरुद्ध वेस्ट इंडिज 13.4 षटकांत 3 बाद 108 (ख्रिस गेल 50, निकोलस पुरन नाबाद 34, मोहम्मद आमिर 3-26).