मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे. यातच त्यांनी निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीयपक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
If in this phase of his life, Eknath Khadse is quitting BJP with tears in his eyes after serving the party for 40 years and now joining NCP, then there must be a big reason behind his decision. ‘Unki kundli jamm gai hogi’: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/6tW7OLvNf0
— ANI (@ANI) October 22, 2020
यातच माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे खासदार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही खडसेंचं महाविकास आघाडीत स्वागत केलंय.
काय म्हणाले संजय राऊत
आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. गेल्या 40 वर्षे भाजपासाठी काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठं कारण असणार, उनकी कुंडली जम गई होगी… असे म्हणत नाथाभाऊंचे
महाविकास आघाडीत स्वागत केले आहे.