पुणे – २९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच घर केले असून, त्यांच्या अभिनयाचे सुद्धा तितकेच कौतुक झाले आहे.
आतापर्यंत बहुतेकांनी चित्रपटातील मुख्य कलाकार परश्या आणि आर्ची यांच्या बद्दलबरंच काही ऐकलं व वाचलंही असेल. याच सैराट मध्ये परश्याचे जिवलग मित्र असलेले सल्या (अरबाज) आणि लंगड्या (तानाजी) यांच्या देखील अभिनयचं तितकंच कौतुक झालं जितकं चित्रपटातील मुख्य कलाकारांचं झालं.
https://www.facebook.com/freehitdankamarathimovie/posts/120620546476579
दरम्यान, आता सैराट नंतर पुन्हा एकदा अरबाज आणि तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवणार आहे. सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटातून पुन्हा ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकरणार आहे. मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं.
लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा जोमाने चित्रपटसृष्टी काम करू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘फ्री हिट दणका’ या नवीन चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे.