जेएनयू हल्ल्याच्या विरोधात वसतिगृहाच्या वॉर्डनचा राजीनामा
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचारप्रकरणी विद्यापीठातील वसतिगृहाच्या वरिष्ठ वॉर्डन आर. मीना यांनी राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मात्र, आम्ही सुरक्षा पुरवू शकलो नाही, असे सांगत त्यांनी याची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे.
R. Meena, senior warden of Sabarmati Hostel of Jawaharlal Nehru University (JNU) has resigned stating, ‘we tried but could not provide security to hostel.’ #JNUViolence pic.twitter.com/9K68Fe1LIX
— ANI (@ANI) January 6, 2020
आर. मीना या जेएनयूतील साबरमती वसतिगृहाच्यावरिष्ठ वॉर्डन आहेत. त्यांनी विद्यापीठातील हिंसाचाराविरोधात राजीनामा दिला आहे. दरम्यान, जेएनयू हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तर या हिंसाचारात जखमी झालेल्या 23 विद्यार्थ्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जेएनयू हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तीन तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींवरुन या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या पोलीस सहआयुक्त शालिनी सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या पथकात पोलीस निरिक्षक आणि दोन अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा समावेश असणार आहे.