मुंबई – माजी राष्ट्रपती ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांची यशोगाथा आता रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून अनेक थोर व्यक्तींच्या जीवनावर बायोपिक तयार होत असून, यामध्ये आता डॉ. कलाम यांच्या देखील बायोपिकची भर पडणार आहे.
दरम्यान, या चित्रपटात डॉ. कलाम यांच्या भूमिकेला बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेते ‘परेश रावल’ न्याय देताना दिसणार आहे. परेश रावल यांनी आपल्या ट्विटर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे. रावल यांनी ट्विट केलंय की, “माझ्या मते अब्दुल कलाम हे संत होते. मला कलाम यांची भूमिका साकारायला मिळाली हे माझे भाग्य आहे”. असं त्यांनी म्हंटलं आहे.
In my humble opinion he was SAINT KALAM !i am so blessed and fortunate that I will be playing KALAM Saab in his biopic . https://t.co/0e8K3O6fMB
— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 4, 2020
याआधी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारण्यासाठी परेश रावल यांनी आपली इच्छा व्यक्त करून दाखवली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांने ती साकारता आली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने भूमिका साकारली.