मांजरी (प्रतिनिधी) – “सर्व पक्षांनी एकाच व्यासपीठावर जनतेसमोर यावे आणि पुणे शहराच्या विकासात कोणी किती भर घातली ते सांगावे. गेल्या पन्नास वर्षात त्यांना जे जमले नाही ते व त्याहीपेक्षा जास्त काम आम्ही पाचच वर्षात करून दाखवले आहे.असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
शेवाळेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे तीन हजार नागरिकांना हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड व युनिव्हर्सल कार्डची नोंदणी करण्यात आली आहे. त्याचे काही नागरिकांना प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार राहुल कुल, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक मारूती तुपे, जीवन जाधव, डॉ. बाळासाहेब हरपळे, मांजरीचे माजी सरपंच शिवराज घुले, आण्णा धारवाडकर,माजी उपसरपंच अमित घुले,धनंजय कामठे, संदीप हरपळे, गजेंद्र मोरे, डॉ. दादा कोद्रे आदीसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले,’ राहुल शेवाळे यांनी कोरोना काळात राबविलेले “अटल आरोग्यरथ अभियान’ व शेवाळेवाडी गावासाठी सुरू केलेल्या “नरेंद्र मोदी जन आरोग्य योजनेचे’ पाटील यांनी यावेळी कौतुक केले. सूत्रसंचालन सुनील शेवाळे, शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले. अविनाश कोद्रे यांनी आभार मानले.