रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे पाश्चात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियनने रविवारी रशियन विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली. युरोपियन युनियन व्यतिरिक्त कॅनडानेही रशियासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.
युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन यांनी सांगितले की, रशियन विमानांसाठी युरोपियन युनियनचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यामध्ये रशियन विमान, रशियन नोंदणीकृत विमाने आणि रशियन नियंत्रित विमानांचा समावेश आहे. खासगी विमानांनाही हे निर्बंध लागू होणार आहेत. युरोपियन युनियनमध्ये 27 देश आहेत.
युरोपियन युनियनमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वीडन यांचा समावेश आहे.
दरम्यान, युरोपियन युनियनच्या घोषणेपूर्वीच, त्याच्या अनेक सदस्य देशांनी रशियासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो यांनी ट्विट केले की, ‘आमची हवाई क्षेत्र लोकांना जोडणाऱ्यांसाठी खुली आहे, ज्यांना क्रूरपणे हल्ला करायचा आहे त्यांच्यासाठी नाही.’
त्याचवेळी, नेदरलँडचे पायाभूत सुविधा आणि जलनिर्मिती मंत्री मार्क हार्बर्स यांनी ट्विट केले की, ‘अनावश्यक आणि क्रूर हिंसाचार करणाऱ्यांना आमच्या हवाई क्षेत्रात जागा नाही.’