मुंबई – शिंदे गटाच्या शितल म्हात्रें यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. त्यानंतर सोमवारी आयोगाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. यावरून आता शितल म्हात्रे यांनी ट्विट करत, ‘आमच्याकडे आधी बाळासाहेब मग पक्ष आणि तिकडे आधी पक्ष’ असं ट्विट करत टीका केली आहे.
शितल म्हात्रे यांचे ट्विट
आमच्याकडे
आधी बाळासाहेब मग पक्ष आणि तिकडे
आधी पक्ष, मग स्वतः आणि सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे!!!
फरक स्पष्ट आहे….— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 10, 2022