वासुंदे -येथील वांसुदे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा आणि नियोजित वॉटर फिल्टर प्लॉण्टचा भूमिपूजन समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी दौंड पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले, सदस्य विकास कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती आप्पासाहेब पवार हे होते.
यावेळी जि. प. सदस्य विरधवल जगदाळे, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे यांनी मनोगत व्यक्त केले. सोसायटीचे चेअरमन उमाजी मेरगळ, उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
वासुंदेचे सरपंच नीलेश भोईटे, उपसरपंच किशोर जांबले, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग साळुंके, उमेश जांबले, शहाजी खोमणे, निखिल जाधव, बॅंकेचे शाखाधिकारी सचिन यादव, सोसायटीचे सचिव संजय साळवे, हनुमंत खराडे, संचालक संतोष जांबले, पोपट जगताप, प्रभाकर जांबले, नीलेश लोंढे, सुनील लोंढे, सहसचिव दुर्गेश जगताप, सुदाम कुंभार, रमेश खोमणे यांसह कार्यक्रमास आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.