चिंबळी -विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सुदृढ व निरोगी राहण्यासाठी फडकेवस्ती (निघोजे, ता. खेड) येथील प्राथमिक शाळेत वॉटर बेल (पाणी पिण्याची घंटा) उपक्रम सुरू केल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले.
ठराविकवेळी पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असते शाळेतील मुले खेळाच्या नादात पुरेसे पाणी पित नाहीत, त्यांना पुरेसे पाणी पिण्याची सवय लागावी, यासाठी नेहमीच्या सुट्टीच्या घंटेशिवाय इतर तीन घंटा या पाणी पिण्याची आठवण करण्यासाठी ठेवल्या आहेत.
पाणी कमी पिण्यामुळे डीहायर्डेशन, मुतखडा यासारखे आजार होऊ शकतात, ते टाळण्यासाठी शरीरात भरपूर पाण्याची असणारी आवश्यकता या उपक्रमांमुळे पूर्ण होणार आहे. विद्यार्थांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फॉक्स वॅगन कंपनीच्या वतीने शाळेस वॉटर फिल्टर उपलब्ध करुन दिले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ शाळा व्यवास्थापन समितीचे अध्यक्ष राजेश येळवंडे, उपाध्यक्षा सरिता कामठे, उपशिक्षिका सीता गेंगजे, संदीप शिरोळे, गजानन फडके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे ,विस्तारअधिकारी जीवन कोकणे, सुरेश कातोरे, केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.