जेजुरी – गेल्या दोन दिवसांपासून सासवडमध्ये मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज मुक्काम हलवला असून पालखीने आज सोन्याच्या जेजुरीमध्ये प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल होताच वारकऱ्यांनी खंडोबाच्या दर्शनासाठी मल्हार गडावर गर्दी केली आहे.