शनिवारवाडा-दगडूशेठ मंदिर-मंडई मार्गावर वॉकिंग प्लाझा?

पुणे – शहरातील इतर भागांसह मध्यवर्ती परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यामुळे शनिवारवाडा, लाल महाल, नाना वाडा, दगडूशेठ मंदिर आणि मंडईची इमारत या परिसरामध्ये “हेरिटेज वॉकिंग प्लाझा’ करणे सोयीस्कर होणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. याची अंमलबजावणी झाल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकेल, अशी शक्‍यता वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शिवाजी रस्त्यावर सुमारे 500 मीटरच्या अंतरात तीन ते चार प्रेक्षणीय स्थळे आहेत. तेथे पर्यटक हमखास येतात. त्यामुळे पर्यटकांसह पुणेकरांच्या दृष्टीने “हेरिटेज वॉकिंग प्लाझा’ सोयीचा होईल. तसेच या रस्त्यावर दागिने, कपडे, शोभेच्या वस्तू, मोबाइलची दुकाने आहेत. तर, मंडई परिसरात भाजी व्यावसायिक, फुल विक्रेते यांसह पथारी व्यावसायिकांची गर्दी अधिक असते. आठवडाभर हा परिसर गर्दीने व्यापलेला असतो. हे रस्ते तुलनेने लहान असून गर्दी मात्र जास्त आहे. यावर तोडगा काढण्यासाठी “वॉकिंग प्लाझा’ सोयीस्कर ठरण्याचा अंदाज आहे.

…म्हणून वॉकिंग प्लाझा फायद्याचा
अपुऱ्या पडणाऱ्या या रस्त्यावर दुचाकी, चारचाकींची गर्दी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. दिवसेंदिवस बसेसचे ब्रेकडाऊन वाढत असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुढील काही काळामध्ये वॉकिंग प्लाझा झाल्यास फायदा होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.