लाहोर – आयसीसीच्या 2011 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय फलंदाजीची वाताहत केलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज आज हलाखीचे जीवन जगत आहे. लाहेरमधील एका रस्त्यावर रियाज चक्क चणे विकताना दिसला. ( Wahab Riaz Found Selling Channa On Streets ) सध्या त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नसून त्याची पाकिस्तान संघात निवडही झालेली नाही. मुळातच पाकिस्तान क्रिकेट मंडळ सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने देशांतर्गत क्रिकेटलाही घरघर लागली आहे. त्यामुळे रियाजसारख्या कित्येक खेळाडूंना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे.
रियाजने 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
2011 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत मोहालीत झालेल्या सामन्यात भारताचे 5 गडी बाद करत त्याने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. मात्र, त्यानंतर कामगिरीत सातत्य नसल्याने ते सध्या हलाखीचे जीवन जगत आहे.