मतदानादिवशीचा आठवडी बाजार रद्द

सोलापूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादिवशी भरणाऱ्या 59 गावांचा आठवडी बाजार उद्या, दि. 18 रोजी बंद राहणार आहेत. हा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 36 गावांचा, तर माढा लोकसभा मतदारसंघातील 23 गावांचा समावेश आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबीदारफळ, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुस्ती, आहेरवाडी, भंडारकवठे, बार्शी तालुक्‍यातील पानगाव, शेळगाव (आर), अक्कलकोट तालुक्‍यातील सलगर, बादोले (ब्रु), कडबगाव (स्टे), काझीकणबस, तडवळ, पंढरपूर तालुक्‍यातील खर्डी, शेटफळ, रांझणी, बोहाळी आणि पंढरपूर, मंगळवेढा तालुक्‍यातील मंगळवेढा, पाटखळ, भोसे, हुन्नूर, रेड्डे, बोराळे, सिध्दापूर, मरवडे, निंबोणी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, सिरसी, गोणेवाडी, नंदेश्वर, लवंगी, हुलजंती आणि सलगर (ब्रु) तर मोहोळ तालुक्‍यातील अनगर, घोडेश्वर आणि खंडाळी येथील बाजार दर गुरुवारी भरतात. पण गुरुवार, दि. 18 रोजी मतदान होणार असल्याने हे बाजार भरणार नाहीत. याची सर्व शेतकरी आणि व्यापा-यांनी दखल घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.