नवी दिल्ली – रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून व्हीके त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर-पूर्व रेल्वे गोरखपूरच्या नियुक्ती समितीचे महाव्यवस्थापक व्ही.के. त्रिपाठी यांना सहा महिन्यांसाठी (1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022) रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने जारी केलेल्या आदेशात देण्यात आली आहे. त्रिपाठी हे 1983 च्या बॅचचे IRSEE (इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्स) अधिकारी आहेत.