#ViralPost : मला आमची ४० हजार मंदिरे परत हवी

नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं दिला. याच पार्श्‍वभूमी राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलेब्सनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली होती. यातच नुकतेच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ‘मला माझी मशीद परत हवी’ अशी प्रतिक्रिया दिली, असतांना त्यांच्या विरोधात  बिग बॉस  फेम अभिनेत्री कोयना मित्रा हिने वादग्रस्त ट्विट केले आहे.


दरम्यान,  या निकालाशी सहमत नसलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी “मला माझी मशीद परत हवी आहे” IWantMyMasjidBack या हॅशटॅग वापरत ट्विट केले होते. या ट्विटवर प्रतिक्रीया देताना “मला आमची ४० हजार मंदिरे परत हवी आहेत.” असे ट्विट कोयना मित्रा हिने केले.

कोयनाने ओवेसींविरोधात केलेले हे ट्विट सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. काही तासात तब्बल २३ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कोयनाची स्तुती केली तर काहींनी तिच्यावर टीका देखील केली आहे. ओवेसींच्या ट्विटनंतर ‘#ओवैसी_भारत_छोड़ो हा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here