Madhavi Lata | Asaduddin Owaisi – हैदराबादमधील भाजपच्या उमेदवार माधवी लता आणि एम आयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांच्यातील कायदेशीर संघर्ष आता गंभीर वळण घेताना दिसत आहे. प्रार्थनास्थलाच्या दिशेने बाण मारल्याची कृती दर्शवणारा माधवी लता यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली.
आता त्याला प्रत्युत्तर म्हणून माधवी लता यांनी ओवेसींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुन्या हैदराबादमध्ये प्रचारादरम्यान असदुद्दीन ओवेसी कसायांना गायींची कत्तल करण्यास प्रोत्साहित करत आहेत, असा आरोप माधवी लता यांनी केला आहे.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवार माधवी लता यांनी एआयएमआयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओचा हवाला देत माधवी लता म्हणाल्या की, हैदराबादच्या जुन्या शहरात त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान असदुद्दीन ओवेसी कसाईंना गायींची कत्तल करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
ओवेसी हे गोमांस खाण्याचं समर्थन करत आहेत, ज्यामुळे एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्या जातात. ओवेसी निवडणुकीच्या फायद्यासाठी अशी विधाने करत आहेत.
ओवेसी म्हणाले- अल्पसंख्याकांचे आरक्षण जाणार…
असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मोदी सरकार अल्पसंख्याकांचे आरक्षण काढून घेईल. माझे शब्द लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान दुरूस्ती करतील, आरक्षण काढून घेतले जाईल.