मुंबई : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी रुग्णालयांना काही निकष ठरवून दिले आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करत असताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे. असं असलं तरी काही रुग्णालयांतर्फे सरकारी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील काही रुग्णालयांना भेट दिली होती.
आरोग्य मंत्र्यांच्या भेटीनंतर आता मुंबईतील काही बड्या रुग्णालयांना कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून आपण काल रुग्णालयांना भेटी दिल्यानंतर यातील काही रुग्णालये सरकारी सूचनांचे पालन करत नसल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगितले.
Yesterday I visited a few hospitals to see if govt rules are being implemented properly or not. I found that the implementation was not up to the mark at some places and show cause notices have been issued: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/RpidqX22o2
— ANI (@ANI) June 2, 2020
या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस
सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल व लीलावती हॉस्पिटल या रुग्णालयांना सरकारतर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.
Maharashtra Government has served a show-cause notice to Bombay Hospital, Jaslok Hospital, Hinduja Hospital and Lilavati Hospital for allegedly violating government norms on admission and treatment of #COVID19 patients.
— ANI (@ANI) June 2, 2020