Vikramaditya Singh । लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षांनी बऱ्यापैकी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच आता हिमाचल लोकसभा निवडणुक देखील रंजक होणार असल्याचे दिसुन येत आहे. कारण हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये अगोदरच भाजपने अभिनेत्री कंगना राणावतला तिकीट दिले आहे. आता कंगनाची विरोधात काँग्रेसने मंडीच्या जागेवर आपला उमेदवार फिक्स केल्याचे सांगण्यात येतंय.
तरुण मतदारांमध्ये विक्रमादित्य सिंह लोकाप्रिय Vikramaditya Singh ।
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यावेळी आमदार विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोरीसाठी पावले उचलली होती. त्याच विक्रमादित्य सिंह यांना कंगनाच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. काँग्रेसला मंडीच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी पुन्हा निवडणूक लढवायची होती. पण मंडी जागेच्या सर्वेक्षणात विक्रमादित्य सिंह यांचे आकडे चांगले होते. तरुण मतदारांमध्ये कंगनाला फक्त विक्रमादित्य सिंगच टक्कर देऊ शकतील, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
सखू सरकारच्या स्थैर्यावरील संकटामुळे पक्षाची कोंडी झाली होती, पण नंतर प्रतिभा सिंह यांचा मुलगा आणि सखू सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंग कंगनाच्या विरोधात निवडणूक लढवणार हे निश्चित झाले. विक्रमादित्य सिंह यांनी निवडणूक जिंकल्यास प्रतिभा सिंह त्यांच्या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवतील.
…तर विक्रमादित्य यांच्या जागी प्रतिभा सिंह निवडणूक लढणार ? Vikramaditya Singh ।
2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंडित रामस्वरूप शर्मा येथून विजयी झाले होते. 2014 मध्ये प्रतिभा सिंह यांचा रामस्वरूप शर्मा यांच्या विरोधात पराभव झाला होता. यानंतर प्रतिभा सिंह यांनी येथून 2019 ची निवडणूक लढवली नाही. त्यांच्या जागी काँग्रेसने पंडित सुखराम यांचे नातू आश्रय शर्मा यांना तिकीट दिले, पण त्यांनाही विजय मिळवता आला नाही.
पंडित रामस्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीत प्रतिभा सिंह विजयी झाल्या. प्रतिभा सिंह यांच्या विजयात तत्कालीन भाजप सरकारच्या सत्ताविरोधी कारभाराशिवाय वीरभद्र सिंह यांच्या निधनाची भावनिक लाटही आली होती.
काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार विक्रमादित्य सिंह हे मंडी लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहेत. विक्रमादित्य सिंह हे सध्या सिमला ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री खात्यासह विकास खातेही सांभाळत आहेत.