पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीअखेर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, पुण्याचा आदित्य सामंत, एफएम सौरव खेर्डेकर, सिद्धांत गायकवाड या खेळाडूंनी 3 गुणांसह आघाडी मिळवली आहे.
या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीने राजस्थानच्या एएफएम नारायण जोशीचा पराभव करून 3 गुण प्राप्त केले. तर, महाराष्ट्राच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने मध्य प्रदेशच्या सेरा डागारियाचा पराभव करून 3 गुण प्राप्त केले.
महाराष्ट्राच्या सौरव खेर्डेकरने पियुष नार्सीकरचा, तर सिद्धांत गायकवाडने आरव लखानीचा पराभव करून आपली आघाडी कायम ठेवली.