राजगुरूनगरात राज्यभरातून 250 अधिक खेळाडुंचा सहभाग
राजगुरूनगर – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल अंतर्गत, क्राऊन बुद्धिबळ अकॅडमी राजगुरूनगर आयोजित एकदिवसीय खुल्या व 15 वर्षांखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा पुण्यातील राजगुरूनगर येथे झाल्या. या स्पर्धेत राज्यभरातून 250 अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत खुला गटातून ललितआदित्य अय्यंनार बुमिनाथन याने तर 15 वर्षांखालील अन्वय सलील झेंडे याने पटकावला.
र्धेमध्ये एकूण साठ हजार रुपये रकमेची रोख बक्षिसे त्याचबरोबर चषक व पदक यांची कमाई स्पर्धकांनी केली. स्पर्धा पाहण्याचा मुलांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन धनंजय भागवत, प्रा. दीपक गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी आकाश तालीकोटे, दिनेश भरसाकळे, गणेश फलके, अजय शिंगवी, डॉ. ऋषिकेश ठोंबरे आदी उपस्थित होते. तर स्पर्धा सुरू असताना खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, डॉ. अमोल बेनके, डॉ. आशिष पोखरकर, माजी सरपंच प्रदीप कासवा,
अॅड. गणेश होणराव, सुनील मांजरे, गजानन मायदेव, माया राक्षे, तृप्ती जरेकर, डॉ. राजश्री इंगवले आदींनी भेटी दिल्या. या स्पर्धेची सुरुवात निलेश रांजणे यांनी संविधान वाचन करून झाली. बक्षीस वितरण उद्योजक मंगेश सावंत, डॉ. ऋषिकेश ठोंबरे,नाझीम इनामदार, अॅड.पद्माकर साळवे, दीपक गायकवाड यांच्या हस्ते झाले सूत्रसंचालन धम्मदीप बनसोडे यांनी तर दीपक गायकवाड यांनी आभार मानले.
गटनिहाय विजते पुढीलप्रमाणे;
खुल्या गट : ओमकार कडाव (द्वितीय), गितेश मिश्रा (तृतीय). महिला गट : भाग्यश्री भांडेकर(प्रथम), ज्येष्ठ नागरिक गट : लहुचंद ठाकुर (प्रथम). 15 वर्षे : अथर्व रणजीत पाटील (द्वितीय), प्रखर अमित पुंरदरे (तृतीय). 12 वर्षे : ईशान महेश कदम (प्रथम). 9 वर्षे : नैतिक माने(प्रथम).