Mukesh Ambani: मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांच्या जुळ्या नातवंडांचा आदिया आणि कृष्णाचा पहिला वाढदिवस साजरा केला. ही दोघे ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल यांची जुळी मुले आहेत, त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता. यानिमित्ताने अंबानी कुटुंबाने आज म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये एका ग्रँड बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते.
#WATCH | Mumbai | Mukesh Ambani and Nita Ambani with their grandchildren Aadiya And Krishna. The twins of Isha Ambani-Anand Piramal are celebrating their first birthday today. pic.twitter.com/q9Zf6eaKpB
— ANI (@ANI) November 18, 2023
यावेळी करण जोहर आणि कियारा अडवाणीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे आणि कतरिना कैफ सारखे स्टार्सही या पार्टीत सहभागी झाले होते. क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत या पार्टीला हजेरी लावली.