मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हे बॉलीवूडमधील एक क्युट कपल आहे. हे दोघेही सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असतात. आपले फोटोज आणि व्हिडिओ ते सतत सोशल मीडियावर शेअर करत असतात.
View this post on Instagram
सध्या दोघांचाही असाच एक रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रितेशसोबतचा आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दोघेही रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत.
View this post on Instagram
एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. पण या दोघांमध्ये तिसराच कुणीतरी येतो आणि त्यांच्या रोमान्सची वाट लावतो. हा तिसरा तो म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा आहे. दोघेही जेव्हा रोमॅंटिक मूडमध्ये असतात. तेव्हा त्यांचा हा डॉग त्यांच्यासोबतच होता. त्या दोघांच्या अगदी मध्ये. जेव्हा दोघेही जवळ येतात.
View this post on Instagram
तेव्हा हा कुत्रा त्यांच्यामध्ये येतो आणि दोघांच्या गालावर आपल्या जिभेने चाटू लागतो. तेव्हा जेनेलियाला हसूच कोसळते. ती आपल्या कुत्र्याला जवळ घेते, त्याला मिठी मारते. यावेळी रितेशच्या चेहऱ्यावरील हावभाव मात्र पाहण्यासारखे आहेत.
View this post on Instagram
त्यातही जेनेलिया जेव्हा कुत्र्याला गोड पापी देते तेव्हा तर त्याचा चेहरा अधिकच उदास होतो. मग जेनेलिया हसत हसत रितेशच्याही गालावर किस करते आणि त्याला मिठी मारते. तेव्हा कुठे रितेशच्या चेहऱ्यावर हसू फुलते आणि तोसुद्धा आपल्या कुत्र्याला प्रेमाने मिठी मारतो.