मुंबई – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तिने मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एका खास कॅप्शनसह तिने ही पोस्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ताला इतका आनंद झाला आहे की “आनंद पोटात माझ्या मायेना’ असेच ती म्हणाली आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता माळी “महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूचसंचालन करते. या शोमधील टीमचा सत्कार करण्यात आला आहे. शोची पूर्ण टीम वर्षावर गेली होती. त्यावेळी प्राजक्ताची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली.
प्राजक्ता माळीने पोस्टमध्ये सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. तीही “वर्षा’वर. असं सांगताना तिने “आनंद पोटात माझ्या मायेना’ असा हॅशटॅगही दिला आहे. साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आल्याचे तिने सांगितले.
व्यस्त वेळापत्रकातून सबंध एक तास आम्हाला दिल्याबद्दल. मनापासून कौतुक करून उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. सोबतच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचा उल्लेख करत तिने त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत.