पुणे – शब्बीनेनी मेघना व जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या अफलातून अर्धशतकी खेळीच्या जोरावर महिलांच्या टी-20 चॅलेंज टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात ट्रेलब्लेझस संघाने मर्यादीत 20 षटकांत 5 गडी गमावून 190 धावा उभारल्या.
वेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकत ट्रेलब्लेझरला प्रथम फलंदाजी दिली. स्टार फलंदाज स्मृती मानधना लवकर बाद जाल्यानंतर मात्र, मेघनाने जेमिमाच्या साथित डाव सावरताना दमदार शतकी भागीदारी केली. या जोडीने वेलॉसिटीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवताना तुफानी फटकेबाजी केली. मेघना जास्त आक्रमक होती. तीने चौकार व षटकारांची बरसात केली व वेलॉसिटीच्या गोलंदाजांवर चांगलेच दडपण राखले. 47 चेंडूत 7 चौकार व 4 षठकारांची आतषबाजी करत मेघना 73 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमाने हेली मॅथ्युजच्या साथीत संघाला दीडशतकी धावंची मजल मारुन दिली.
Innings Break!
Half-centuries from S Meghana (73) & Jemimah (66) propel Trailblazers to a formidable total of 190/5 on the board.
Scorecard – https://t.co/FLFvj1HDlk #VELvTBL #My11CircleWT20C pic.twitter.com/SXrnwSdj0H
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यावर वेगाने धावा करताना ती देखील परतली. तीने आपल्या 66 धावांच्या खेळीत 44 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर मॅथ्युजने सोफिया डन्कलेला साथिला घेत संघाला 20 षटकांत 5 बाद 190 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. डन्कलेने 8 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 19 धावा केल्या. मॅथ्युज 16 चेंडूत 4 चौकार फटकावून 27 धावा करुन बाद झाली. वेलॉसिटीकडून सिमरन बहादूरने सर्वाधिक 2 बळी मिळवले.
या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर व वेलॉसिटी हे तिन संघ सहभागी झाले असून राउंड रॉबिन पद्धतीने हे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेत प्रत्येक संघ अन्य संघाशी खेळला असून सर्वाधिक विजयाची नोंद केलेले दोन संघ शनिवारी अंतिम लढत खेळतील. या सामन्यात ट्रेलब्लेझरला विजयाची गरज आहे, अन्यथा ते स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत.
पहिल्या सामन्यात त्यांना सुपरनोव्हाजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वेलॉसिटीने सुपरनोव्हाजचा पराभव केला होता. त्यामुले या दोन संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. आज ट्रेलब्लेझर संघ पराभूत झाला तर येत्या शनिवारी सुपरनोव्हाज व वेलॉसिटी यांच्यातच अंतिम लढत होईल. महिलांच्या परिपूर्ण आयपीएल स्पर्धेची मागणी होत असताना या स्पर्धेत हे तीनही संघ सरस कामगिरी करत आहेत. त्यामुळेच येत्या काळात पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर महिलांचीही आयपीएल खेळवली जावी याच हेतूला आता बळकटी मिळत आहे.
संक्षिप्त धावफलक – ट्रेलब्लेझर – 20 षटकांत 5 बाद 190 धावा. (शब्बीनेनी मेघना 73, जेमिमा रॉड्रीग्ज 66, हेली मॅथ्युज 27, सोफिया डन्कले 19, सिमरन बहादूर 2-31).