#WomensT20Challenge : कोणाची होणार आज सरशी

ट्रेलब्लेझर्सविरुद्ध सुपरनोव्हाजचे पारडे जड

शारजा – हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज व स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स यांच्यात आज महिलांच्या चॅलेंजर मिनी आयपीएल टी-20 स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेत साखळीतील लढत शनिवारी झाली होती व त्यात सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सचा पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्यांचेच पारडे जड राहणार आहे.

महिलांच्या स्पर्धेचे सलग दोनवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या सुपरनोव्हाजला यंदा हॅट्ट्रिक साकारण्याची संधी आहे. या संघाची कर्णधार हरमनप्रीत हीच भारताच्या महिला संघाची कर्णधार असल्याने तिला या स्पर्धेत खेळत असलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंचा खेळ माहीत आहे. तसेच त्यांचे कमकुवत दुवेही माहीत आहेत, त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघातील परदेशी खेळाडू भारतीय खेळाडूंसह किती दर्जेदार खेळ करतात त्यावरूनच कोणता संघ बाजी मारणार हे देखील स्पष्ट होणार आहे.

साखळीतील अखेरच्या सामन्यात सुपरनोव्हाजच आव्हानाचा चांगला पाठलाग ट्रेलब्लेझर्स संघाने केला होता. मात्र, अखेरच्या षटकांत त्यांना काहीसे अपयश आल्याने त्यांना हा सामना केवळ 2 धावांनी गमवावा लागला होता.

शनिवारच्या सामन्यात सुपरनोव्हाजने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही ट्रेलब्लेझर्सवर दडपण टाकले होते. सुपरनोव्हाज संघाची संपूर्ण मदार जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, राधा यादव यांच्यावर जरी राहणार असली तरीही सध्याच्या महिला क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून नावारूपाला आलेली श्रीलंकेची चामरी अटापटू हिचा खेळ ट्रेलब्लेझर्ससाठी सरप्राईज पॅकेज ठरू शकतो. साखळीतील सामन्यात तिने वादळी फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. सुपरनोव्हाजला रोखायचे असेल तर ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांना तिच्यावर अंकूश ठेवावा लागणार आहे.

ट्रेलब्लेझर्सची कर्णधार व स्टार खेळाडू स्मृती मानधना या स्पर्धेत फारशी यशस्वी ठरलेली नसली तरीही तिच्यावरच ट्रेलब्लेझर्सशी मदार आहे. तसेच पूनम राऊत, झुलन गोस्वामी या अनुभवी खेळाडूंबरोबरच दीप्ती शर्मा व सोफी एकेलस्टोन या अष्टपैलू खेळाडूंनाही सरस कामगिरी करावी लागणार आहे.

एक्केलस्टोन निर्णायक ठरेल 

या स्पर्धेत ट्रेलब्लेझर्सची अष्टपैलु खेळाडू सोफिया एक्केलस्टोन हीची कामगिरीच निर्णायक ठरणार आहे. तीने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तीची डावखूरी फिरकी गोलंदाजी या स्पर्धेत सातत्याने यशस्वी ठरली आहे. त्यातच तीच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याचीही क्षमता असल्याने तीला रोखण्यासाठी सुपरनोव्हाजला अत्यंत सरस कामगिरी करावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.