वत्सलाताई पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस

कराड – शिवसेना-भाजप युतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील व जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या मातोश्री श्रीमती वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांची खा. उदयनराजे भोसले यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील समोरासमोर लढत देत आहेत.

खा. उदयनराजे बुधवारी कराड-पाटण-ढेबेवाडी दौऱ्यावर होते. त्यावेळी श्रीमती वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे त्यांना समजले. काल सकाळी घरात पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळातवेळ काढून श्री. छ. उदयनराजे यांनी रात्री सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, डॉ. शेखर घोरपडे उपस्थित होते. उदयनराजेंनी संबंधित डॉक्‍टरांशी चर्चा करुन श्रीमती पाटील यांच्यावरील उपचारासंदर्भात सूचना केल्या. उपचारात काही कमतरता पडू देऊ नका, असे त्यांनी सुचित केले. तसेच वत्सलाताईं आईसाहेबांना लवकर आराम पडेल, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.