‘ती’ कुजबूज नेमकी कशासाठी?

नांदेड लोकसभा मतदारसंघात विजयश्री मिळविण्यासाठी भाजपने आतापर्यंत अनेकदा कष्ट घेतले आहेत. पण, अशोक चव्हाणांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे नुकतेच “भाजपेयी’ झाले आहेत. गेल्या 5-7 वर्षांत त्यांनी लोकभारतीसह जवळपास सर्वच मोठ्या पक्षांचा आसरा घेतला. अगदी गेल्या वर्षीपर्यंत ते शिवसेनेत होते. पण, त्यांनी मित्रपक्षात प्रवेश करत थेट खासदारकीची उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे नांदेडमधील भाजप इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला.

2014 प्रमाणे यंदाही भाजपने येथे नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी एकच चर्चा झाली, ती भाजपचे “बड्या’ नेत्यांशी चर्चा न करता मोदींनी थेट चिखलीकरांशी संवाद सुरू केला. याचे चित्रण मोठ्या स्क्रीनवर अनेकांनी पाहिले. त्यामुळे कानामागून आलेल्या चिखलीकरांबद्दल कुजबूज चांगलीच वाढली आहे. तर, नांदेडला केंद्रीय मंत्रिपद देण्याचे मोदींनी भाषणादरम्यान जाहीरही करून टाकले. त्यामुळे मोदी-चिखलीकर संवाद नेमका कशाबद्दल होता, याची चर्चा जोरात सुरू आहे. तर, गेल्या अनेक वर्षांत मंत्रिपद न उपभोगलेल्या नांदेडकरांनाही थेट केंद्रीय मंत्रिपदाची चाहूल लागली आहे. पण, मतदारराजा कोणाऱ्या पारड्यात आपले वजन टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.