चिनी वंशांच्या मतदारांचे मत!

आसाममध्ये राहणारे चिनी वंशाच्या समुदायाचे लोक वर्षानुवर्षांपासून प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करत आले आहेत. त्यांचे मत निर्णायक ठरो अथवा न ठरो, पण त्यांनी कधीही मतदान करण्यामध्ये अडथळा येऊ दिलेला नाही की खंड पडू दिलेला नाही. हे लोक स्वतःला भारतीयच समजतात.

भारतात चहाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी चीनमधून कामगार आणले होते. पण यातील अनेक जण भारताच्या मातीत रुळले, रुजले. काहींनी तर इथल्या महिलांशी विवाहही केला. याबाबत रिता चौधरी सांगतात की 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी या लोकांना राजस्थानात पाठवण्यात आले होते. यामागचे कारण त्यांच्याकडून जासुसी केली जाण्याची भीती. रिता चौधरी यांनी यावर “मकाम’ नावाची कादंबरीही लिहिली आहे.

आसाममधील माकुममध्ये 16 चीनी वंशाची कुटुंबे असून त्यामध्ये साधारण 30 जणांचा समावेश आहे. एकूण आसाममध्ये अशी 50 चीनी वंशाची कुटुंबे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.