बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दाम्पत्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नात कुटुंब आणि काही खास मित्र सहभागी झाले होते. हा सोहळा अलिबाग येथे संपन्न झाला. लग्नानंतर आता वरुणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
वरुण म्हणला की, मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांच्या शुभेच्छांमुळे पॉझिटिव्हीटी मिळाली आहे. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर आता त्यांचे रिसेप्शन कुठे होणार, यावर अनेक चर्चा समोर येत आहे. वरुण आणि नताशा या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन पुढील आठवड्यात मुंबईत ठेवले जाणार आहे.
View this post on Instagram
येत्या 2 फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्शन आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. हे रिसेप्शन पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या रिसेप्शनला संपूर्ण बॉलीवूड सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, श्रद्धा कपूर यांसारखे कलाकार सहभागी होऊ शकतात. दरम्यान, नताशा दलाल प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलीवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहानपणापासूनचे मित्र आहेत. सध्या ती मुंबईत आई-वडिलांसोबत राहते.