बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याचा आगामी “सत्यमेव जयते-2′ हा चित्रपट काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी जॉनने या चित्रपटाची रिलीज डेट सांगत चाहत्यांना एक मोठी खूषखबर दिली आहे. जॉन अब्राहमने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत यंदाच्या ईदला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली.
View this post on Instagram
जॉनने ट्विट केले की, तन, मन, धनाहून अधिक “जन गण मन…’ महत्त्वाचे आहे. “सत्यमेव जयते’च्या संपूर्ण टीमकडून आपला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. येत्या 14 मे 2021 रोजी ईद दिवशी आपण चित्रपटगृहात भेटू. जॉनच्या “सत्यमेव जयते-2′ चित्रपटाची चाहत्यांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे. या चित्रपटाचे आणखी दोन दिवसांचे शूटिंग बाकी आहे.
View this post on Instagram
परंतु त्यापूर्वीच रिलीज डेट जाहीर करत चाहत्यांची उत्सुकता वाढविण्यात आली आहे. हा चित्रपट भ्रष्टाचारावर आधारित असणार आहे. दरम्यान, जॉनचा हा चित्रपट सलमान खानच्या “राधे – योर मोस्ट वॉंटेड भाई’ चित्रपटाशी क्लॅश होत असल्याने त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली; परंतु “राधे’ आणि “सत्यमेव जयते-2′ हा चित्रपट ईदच्या दिवशीच रिलीज करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे.