अकलूज – येथील शिवरत्न नॉलेज सिटीमध्ये विविध उपक्रमांनी नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त पर्यावरण वाचवा प्रदूषण टाळा, निरोगी आयुष्याचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विदयार्थ्यानी प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन झील 2020 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवरत्न संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवरत्न मॅनेजमेंट स्टडीजचे प्राध्यापक समाधान माने यांनी मैदानी खेळाचे सादरीकरण केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शीतलदेवी मोहिते पाटील, सचिव शिवदास शिंदे, सर्व संचालक, सदस्य, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. रांगोळी, मेंहदी, कार्ड मेकिंग, वाद-विवाद, पेपर प्रेझेंटेशन, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, रिसर्च प्रेझेंटेशन, डान्स, फॅशन शो आदी स्पर्धा दि 1 जानेवारी ते दि. 10 जानेवारी 2020 या कालावधीत पार पडणार आहेत.