नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं होता. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला होता. त्यामुळे भारतातील दोन आणि रशियाच्या स्फूटनिक व्हीसह फायझर लशीला भारतात मान्यता देण्यात आलेली आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला मान्यता देण्यात आली आहे.
अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी भारतात मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी या लशीचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
India expands its vaccine basket!
Johnson and Johnson’s single-dose COVID-19 vaccine is given approval for Emergency Use in India.
Now India has 5 EUA vaccines.
This will further boost our nation’s collective fight against #COVID19
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 7, 2021
भारतात मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवी लस आहे. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने करोनाविरोधातील लढाई लढली जात आहे. भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे.
Johnson and Johnson’s single-dose #COVID19 vaccine is given approval for Emergency Use in India, tweets Union Health Minister Mansukh Mandaviya pic.twitter.com/52l7zHP7qC
— ANI (@ANI) August 7, 2021
‘जॉन्सन अँड जॉन्सन लशीला भारतात देण्यात आलेल्या मान्यतेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून माहिती दिली.