Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यात मागच्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाचे प्रयत्न चालू आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहेत. परंतु, अद्याप त्यात यश आलेले नाही. दरम्यान, बोगद्यात आडकलेल्या मजुरांपर्यंत कॅमेरा पोहचला आहे. त्यांचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये बोगद्यात अडकलेले सर्व मजूर दिसत आहेत. बचाव पथकाने मजुरांपर्यंत एका नलिकेद्वारे (पाईप) अन्न पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. याच पाईपमधून त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवण्यात आला.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel collapse: Rescue workers try to make contact with the trapped workers through walkie-talkie pic.twitter.com/mCr5VRfSi0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2023
मजुरांपर्यंत अन्न आणि पाणी पोहोचवण्यासाठी सहा इंची पाईप टाकण्यात आला आहे. या पाईपच्या मदतीने मजुरांपर्यंत खिचडी आणि पाणी पोहोचवण्यात आले. तसेच कॅमेऱ्याच्या सहाय्याने बोगद्यातली परिस्थिती पाहता आली. आतमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर आतमध्ये अडकलेल्या मजुरांनी सुरक्षा हेल्मेट घातल्याच व्हिडीओत दिसून येत आहे.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Rescue team officials establish audio-visual contact with the workers trapped in the tunnel for the first time, through the pipeline and endoscopic flexi camera.
(Video Source: District Information Officer) pic.twitter.com/JKtAtHQtN4
— ANI (@ANI) November 21, 2023
कामगारांना भात, भाकर, भाजी यांचा पुरवठा करण्यासाठी ढिगाऱ्यातून मोठ्या व्यासाची पर्यायी नलिका टाकण्यात आली आहे. तसेच विविध जीवनसत्वे, नैराश्यावरील औषधे (अँटिडिप्रेसेंट्स) आणि सुका मेवाही पुरवला जात आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी दिली.बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पाइपमधून त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांनी त्यांच्या नातेवाईक मजुरांशी संवाद साधला.