उत्तम जानकर हिंदू खाटीकच

जातवैधता प्रमाण पत्र देण्याचा जातपडताळणी कमिटीला उच्चं न्यायालयाचा आदेश

मुंबई : धनगर आणि खाटीक जातीचे जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा जातपडताळणी कमिटीच्या निर्वाळामुळे गेली 10 वर्षे राजकीय पटावरून दुर असलेल्या उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. जातपडताळणी कमिटीच्या निर्णयावर संताप व्यक्त करत न्यायालयाने चार आठवड्यात मानकर यांना िंहंदू खाटीक असल्याचा जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

2008मध्ये धनगर जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढविणाऱ्या उत्तम जाणकरांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले. ते धनगर समाजाचे नाहीत तर खाटीक समाजाचे असल्याचा दावा विरोधकांनी केला. तसे पुरावे सादर केल्याने जातपडताळणी कमिटीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले. त्यानंतर जाणकार यांनी 2009मध्ये हिंदू खाटीक जातीच्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढविली. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

न्यायलयाने हे प्रकरण पुन्हा जात पडताळणी कमिटीकडे फेरतपासणीला पाठविले. कमिटीच्या तीन सदस्यांपैकी एका सदस्याने खाटीक असल्याचा निर्वाळा दिला, तर अन्य दोघा सदस्यांनी जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा दिला. त्याला जाणकर यांच्या वतीने ऍड. प्रमोद पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या खडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी जात पडताळणी कमिटीच्या निर्णयावर न्यायालयाने संताप व्यक्त करत जाणकर हे जातीने हिंदू खाटीक असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याबाबत कार्यवाही करून चार आठवड्यात प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने जात पडताळणी समितीला दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.