Praniti Shinde on BJP । मागच्याच आठवड्यात भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केला. भाजपकडून राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या नावानंतर इथल्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. या ठिकाणच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपविरुद्ध शड्डू ठोकला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी, ‘सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करतायेत. ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्यादिवशी लोकशाहीलां धोका निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा. ते फक्त गाजर दाखवत आहेत. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे. तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या. मग बाकी ते टेन्शन माझं राहील. मी ईडीबिडीला घाबरत नाही. मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही. त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
प्रणिती शिंदेंचे गंभीर आरोप Praniti Shinde on BJP ।
भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावलीय. दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे. मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावलीय, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हला एवढा आत्मविश्वास आहे. तर एवढी भिती का आहे तुम्हला..? 400 सोडा मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीयेत. कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे, असेही प्रणिती म्हणाल्या.
भाजपमुळे धार्मिक तेढ वाढले Praniti Shinde on BJP ।
भाजपवाले उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं.? हाथी के दात दिखाने के एक और खाणे के एक. यांच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय. तर आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म – जातं करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत. आधी आपण असे नव्हतो, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.