Ram Satpute on Praniti Shinde । सोलापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना रंगणार आहे. त्यात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून रामसातपुते यांना उमेदवारी देण्यात आलीय. यानंतर आता याठिकाणी दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.
“विरोधक खोटे आरोप करुन माझं चारित्र्यहनन करतील, असा थेट आरोप प्रणिती शिंदेंनी विरोधकांवर केला होता. त्यांच्या या आरोपाला आता राम सातपुतेंनी सडेतोड उत्तर दिलंय. याविषयी बोलताना ,”आम्ही संस्कारी असून आमच्यावर असले संस्कार नाहीत, असे म्हटले आहे. त्यासोबतच “त्या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, मी फक्त विकासावरच बोलत आहे ” असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनीएका जाहीर कार्यक्रमात “येत्या काही दिवसांत माझं चारित्र्यहनन करणारे फोटो, पोस्ट दाखवल्या जातील, माझी बदनामी केली जाईल”, असा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर या चर्चेला उधाण आलं होतं. यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दे आम्ही संस्कारी आहोत त्या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, मी फक्त विकासावरच बोलत असल्याचे उत्तर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी म्हटलं.
फडणवीसांनी सोलापूरला जितकं दिलं तेवढं काँग्रेसनं दिलं का? Ram Satpute on Praniti Shinde ।
सोलापूर लोकसभेला आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपानं निवडणूक गाजायला लागली होती. निवडणुकीची लाईन विकासावरून घसरून तिसरीकडेच चालल्याचं पाहून भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आता आपण फक्त विकासावरच बोलणार असल्याचं सांगून प्रणिती यांनीही फक्त विकासावरच बोलावं, असं सुनावलं आहे.
फडणवीसांनी सोलापूरला जितकं दिलं तेवढं काँग्रेसनं दिलं का? असा सवाल करत त्यांनी सोलापुरातील केलेल्या कामांचा पाढा वाचला. प्रणिती शिंदे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यानं वाटेल तशी वक्तव्य करत असून पुलवामा हल्ल्यावरील आरोप हा तर तमाम शहिदांचा अवमान असल्याचं सातपुते यांनी सांगितलं आहे.